Type Here to Get Search Results !

नेवासा - श्री.क्षेत्र देवगड येथील गुरुपौर्णीमा उत्सव रद्द. | C24Taas |

नेवासा - श्री.क्षेत्र देवगड येथील गुरुपौर्णीमा उत्सव रद्द

नेवासा - तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील
श्री दत्त मंदिर संस्थानमध्ये रविवार दि,५ जुलै होणारा गुरुपौर्णिमा महोत्सव हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला असल्याची माहिती श्री दत्त मंदिर संस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली.
आषाढी एकादशीनंतर होणारा गुरुपौर्णिमा उत्सवाला दर वर्षी दोन लाखांपर्यंत भाविक श्री क्षेत्र देवगड येथे भगवान दत्तात्रय व श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या समाधीस्थळी दर्शनास येत असतात मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशभर लाँक डाऊन घोषित केलेले आहे,राज्यभरातील संपूर्ण मठ-मंदिरे बंद आहेत,सर्वच सण-उत्सव यात्रा ह्या कालावधीत बंद आहेत.याच पार्श्वभूमीवर या वर्षीचा गुरुपौर्णिमा महोत्सव हा रद्द करण्यात आलेला आहे.
शासन आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने सर्व भक्तांनी घरी बसूनच आपआपल्या श्रीगुरुंचे स्मरण करावे. देवस्थानच्या वतीने दर्शनार्थी भक्तांना अशी विनंती करण्यात येते की कृपया आपण देवगडला दर्शनासाठी येण्याचे करू नये.जेणे करून आपली गैरसोय होईल,देवस्थान तथा प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन श्री दत्त मंदिर संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी केले आहे.