नेवासा - शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण ; १४ दिवसांसाठी हा परिसर बंद राहणार. | C24Taas |
नेवासा येथील शासकीय ऑफिसमध्ये नोकरीस असलेला एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. हा कर्मचारी मुंबईहून नेवासा फाटा येथे आल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला २९ जुन रोजी त्रास होऊ लागल्याने नेवासा ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले होते. त्या कर्मचाऱ्यांचे घशामधील स्राव गुरुवार १ जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात घेण्यात आले. त्या अहवालात तो शासकीय कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे आढळून आला आहे. नेवासा फाटा परिसर शनिवार ४ जुलै पासून १४ दिवसासाठी कंटेमेंट जोन घोषित करून यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे तसेच सदरचा हा कर्मचारी कार्यालय गेला नसल्याचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सांगितले.