Type Here to Get Search Results !

Pune Mayor Murlidhar Mohol Corona Positive |पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाचा संसर्ग..लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल -महापौर मुरलीधर मोहोळ



पुणे : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली. मुरलीधर मोहोळ यांना ताप आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, शनिवारी (4 जुलै) सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
आतापर्यंत महापौरांसह पाच नगरसेवकांना आणि एका उपायुक्तांना कोरोनाची बाधा झाली. चारही नगरसेवक कोरोना मुक्त झाले आहेत.

“थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील”, असं ट्विट महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे.