Type Here to Get Search Results !

नेवासा आणखी एका व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू !

नेवासा आणखी एका व्यापाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू !
( शंकर नाबदे,सी २४ तास नेवासा. )
नेवासा शहरातील आणखी एका व्यापाऱ्याचा २ सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे.आजपर्यंत नेवासा तालुक्यातील वीस हून अधिक नागरिकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.मात्र अद्याप मृत्यू झालेल्या व्यक्तींचा शासकीय आकडा १९ ऑगस्टपासून १४ वरच आहे.