Type Here to Get Search Results !

कोरोनाचा धमाका : नेवासा तालुक्याचे 27 वे शतक पूर्ण ; आज 28 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24Taas |

नेवासा तालुक्यात आज शुक्रवारी 28 कोरोना बाधित रुग्ण आढळले.| C24Taas |


तर तालुक्‍यातील 46 व्यक्तींच्या घशातील स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले.

आजपर्यंत तालुक्यात 2703 रुग्ण आढळले तर 2535 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.


नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर तसेच कोविड केअर सेंटरला आज शुक्रवार 27 नोव्हेंबर रोजी 92 व्यक्तींच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 13 व्यक्ती तर जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात 02 व्यक्ती तसेच खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात 13 व्यक्ती असे तालुक्यात 28 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

 बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध
  • सोनई - 07 
  • नेवासा खुर्द - 04 
  • गणेशवाडी - 02 
  • शिंगणापूर - 03 
  • सौंदाळा - 01 
  • भालगाव - 02 
  • खामगाव - 02 
  • तरवडी - 01 
  • भेंडा खुर्द - 01 
  • शिरेगाव - 01 
  • रांजणगाव देवी - 01 
  • मुकिंदपूर - 01 
  • पिचडगाव - 01 
  • चिंचबन - 01
असे नेवासा तालुक्यातील 14 गावांमध्ये 28 व्यक्ती कोरोना बाधित आढळले आहे.

आज दुपारी 3 वाजेपर्यंत नेवासा तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2703 झाली आहे. तर आज रोजी 118 कोरोना बाधित व्यक्ती उपचार घेत आहे. तसेच आज 11 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने 2535 व्यक्ती आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 26 नोव्हेंबर पर्यंत 50 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇