नेवासा - ५९ ग्रामपंचायतीचे राजकारण तापले ; सरपंच आरक्षणामुळे पुढाऱ्यांची अडचण. | C24Taas |
नेवासा तालुक्यातील ११४ पैकी ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून गावोगावी चर्चेचे फड रंगू असले तरी सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने गाव पुढाऱ्यांची मात्र अडचण झाली आहे.
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सोनई, कुकाणा, प्रवरासंगम, चांदा, सलाबतपूर, खरवंडी, बेलपिंपळगाव,भेंडा बुद्रुक,देवगाव,शनिशिंगणापूर, जेऊरहैबती,तेलकुडगाव,पिंप्रीशहाली या मोठ्या ग्रामपंचायतीसह अर्ध्या तालुक्यात वर्षाखेरीस निवडणुकीची धामधूम पाहायला मिळणार आहे.मात्र सरपंच आरक्षण सोडत निवडणुकीनंतर होणार असल्याने अनेकांची कोंडी झाल्याचे दिसत आहे तर स्थानिक पातळीवर इच्छुक उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू आहे.पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज भरले जाणार असून इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहे. गावागावात राजकीय वातावरण तापू लागले आहे.तर गावांमध्ये ठिक ठिकाणी चर्चेचे फड रंगू लागले आहे.
साधारणपणे एक लाख ३७ हजार ९८७ इतके मतदार आहे.यामध्ये ७२ हजार ५९१ इतके पुरुष व ६५ हजार ३९६ महिला मतदारांचा समावेश आहे.
या ५९ ग्रामपंचायतीमध्ये सात सदस्य असलेल्या सात, नऊ सदस्य असलेल्या बत्तीस,अकरा सदस्य असलेल्या अकरा,तेरा सदस्य असलेल्या चार,पंधरा सदस्य असलेल्या दोन तर सतरा सदस्य असलेल्या तीन ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
या ५९ ग्रामपंचायतींच्या होणार निवडणूका....
बाभुळखेडा,बाभुळवेढा-उस्थळ दुमाला,बहिरवाडी-धामोरी,बकूपिंपळगाव,बऱ्हाणपूर,बेल्हेकरवाडी,बेलपिंपळगाव,भालगाव,भेंडा बुद्रुक,बोरगांव-सुरेगाव-गंगापूर, चांदा,देवगाव,देवसडे,धनगरवाडी-नारायणवाडी, दिघी,गळनिंब,गेवराई,घोगरगाव,गोंडेगाव-म्हसले, गोणेगाव-इमामपूर,गोयेगव्हाण-पिंपरी शहाली,जळके बुद्रुक,जळके खुर्द,जेऊर,कारेगाव, खडके,खलाल पिंपरी-मडकी-मुरमे,खरवंडी,खेडलेपरमानंद,कुकाणा,लांडेवाडी, लोहगाव,मक्तापूर,माळेवाडी दुमाला,सुरेगाव तरफा दहीगाव-वरखेड,माळेवाडी खालसा-म्हाळापूर-प्रवरासंगम,मांडेगव्हाण-मोरगव्हाण,मंगळापूर,म्हाळस पिंपळगाव,मोरयाचींचोरे,नजीक चिंचोली,नवीन चांदगाव,निंभारी,निपाणी निमगाव,पाचुंदे,पुनतगाव, रामडोह,रांजणगाव,सलाबतपुर,शनी शिंगणापूर,शिंगवे तुकाई,सोनई,सुलतानपूर,तरवडी,तेलकुडगाव,टोका-वाशिम,उस्थळखालसा,वाकडी,वांजोळी,वाटापूर या ग्रामपंचायतींच्या निवडणूका होणार.
शंकर नाबदे,C24 तास नेवासा. मो.9960313029






