Type Here to Get Search Results !

नेवासा येथे भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी. | C24Taas |

नेवासा येथे भगवान विश्वकर्मा यांची जयंती साजरी
भगवान विश्वकर्मा हे विश्वातील कलाकुसर व कारागिरी क्षेत्रातील मंडळींचे दैवत-उद्धव महाराज मंडलिक


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.
नेवासा येथे भगवान विश्वकर्मा यांची जयंती साध्या पध्दतीने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.भगवान विश्वकर्मा हे विश्वातील कलाकुसर व कारागिरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींचे दैवत असून देव शिल्पी असलेले भगवान विश्वकर्मा हे भगवान विष्णूंचे देखील रूप असल्याचे प्रतिपादन सदगुरु नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठाचे महंत गुरुवर्य ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी यावेळी बोलताना केले.

नेवासा येथील सदाशिवनगर परिसरात असलेल्या भगवान विश्वकर्मा मंदिरात भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीच्या निमित्ताने ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी मंदिर पुजारी ह.भ.प. भाऊसाहेब महाराज मोरे यांनी उपस्थित भाविकांचे स्वागत केले.
यावेळी भगवान विश्वकर्मा मंदिराचे मार्गदर्शक विश्वस्त इंजिनियर नगरसेवक सुनीलराव वाघ यांनी प्रास्ताविक केले.कोरोनाच्या महामारीचे संकट गेल्या वर्षांपासून असल्याने यावर्षी देखील दहा ते पंधरा भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक न काढता शासन आदेशाचे पालन करत जयंती साजरी करत असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना हभप उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की भगवान विश्वकर्मा हे विश्वातील कारागीर बांधवांचे दैवत तर आहेच त्याशिवाय भगवान विष्णूंनी अनेक अवतार घेतले त्यामध्ये देव शिल्पी म्हणून भगवान विश्वकर्मा या देवतेकडे पाहिले जाते,आज येथे मंदिर निर्माण झाल्यापासून दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी येथे कारागिरी क्षेत्रातील सर्वधर्मीय बांधव येथे हजेरी लावतात त्यामुळे राष्ट्रीय ऐक्याचे दर्शन येथे होत आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी साध्या पद्धतीने जयंती साजरी होत आहे कोरोनाचे संकट कायमचे जावो व पुन्हा वैभवशाली आनंदाचे दिवस प्राप्त होवो अशी प्रार्थना त्यांनी यावेळी बोलताना केली. 
यावेळी छोटेखानी पद्धतीने झालेल्या कार्यक्रम प्रसंगी हभप उद्धव महाराज मंडलिक यांचे संतपूजन नगरसेवक सुनीलराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वास्तू शिल्पकार राजेंद्र परदेशी,लक्ष्मण मोरे,बबन काकडे,गणेश चौव्हाण,केशव कोबरणे,मच्छीन्द्र गव्हाणे,ज्ञानेश्वर वाघ, चित्रकार भरतकुमार उदावंत,राहुल पडूंरे,कृष्णा महाराज मोरे,कैलास परदेशी, गणेश कु-हाडे,गोरक्षनाथ सोनवणे, तुकाराम गोसावी,रामकीसन घुले सर उपस्थित होते.मंदिर प्रसिद्धी प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर राजेंद्र परदेशी यांनी आभार मानले.

❗ 
नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇