नेवासा तालुक्यातील पत्रकारांना अग्रक्रमाने कोरोनाची लस द्यावी - राजगिरे. | C24Taas |
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.नेवासा - फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांप्रमाणेच नेवासा तालुक्यातील सर्व पत्रकारांना अग्रक्रमाने कोरोना 19 ची प्रतिबंधक लस देण्यात यावी अशी मागणी जेष्ठ पत्रकार रमेश राजगिरे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.नेवासा येथील पत्रकार रमेश तुकाराम राजगिरे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,भारत सरकारने कोरोना 19 ची प्रतिबंधक लस नागरीकांना देण्याचे धोरण जाहिर केलेले आहे. त्यामध्ये अग्रक्रमाने पोलिस कर्मचारी, सफाई कामगार व आरोग्य कर्मचारी आदींना ही लस देण्यात येणार आहे. पंरतु पत्रकार हा समाजाचा सर्वसमावेशक घटक असून तो सतत जनतेमध्ये फिरत असतो.त्यामुळे पत्रकारांनाही व्हॅक्सीनची गरज आहे . पत्रकारांना व्हॅक्सीन कधी मिळेल याची माहिती अदयाप शासनाने दिलेली नाही . त्यामुळे अनेक पत्रकारांची सरकार पत्रकारांसाठी कोविड 19 पासून बचावासाठी काहीच करणार नाही अशी मनोभावना निर्माण होत आहे.केंद्र व राज्य सरकारने पत्रकारांना व्हॅक्सीन लस देण्याबाबदचे धोरण जाहीर करावे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇



