Type Here to Get Search Results !

घोडेगाव येथे डॉ.सोनवणे यांचे उद्या 1 एप्रिल रोजी उपोषण.| C24Taas |

घोडेगाव येथे डॉ.सोनवणे यांचे उद्या 1 एप्रिल रोजी उपोषण.| C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇



नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील डॉ संजय सोनवणे यांच्या हॉस्पिटल लगत झालेल्या अतिक्रमणावर कारवाई न झाल्याने उद्या १ एप्रिल रोजी घोडेगाव ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण करणार आहे.
डॉ संजय सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या वर्षी २५ फेब २० पासून माझ्या जागेच्या संदर्भात ग्रामपंचायत ,ग्रामविकास अधिकारी, गट विकास अधिकारी नेवासा, मुख्य कार्यकारी अधिकारी अहमदनगर, तहसीलदार नेवासा , पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर,  कडे तक्रार अर्ज केला आसुन आदयाप आपण काहीही कारवाई केलेली नाही 
हे पाहून दि.२३ फ़ेब२१ रोजी चंद्रकांत बापुराव सोनवणे याने जबरदस्तीने माझ्या हॉस्पिटल च्या येण्याचा वाग आसलेल्या रस्त्यात शेड चे काम चालू करून अतिक्रमण करत आहे हे ताबडतोब थांबवून रुग्न्नाना येण्या जाण्यास झालेला अडथला दूर करावा तातडीने पोल हटवून जागा खरेदीच्या वेळी १९९१ ते २००५ प्रमाणे नोद पूर्ववत करून वादित आसलेल्या जागे मध्ये सध्या रोड चे काम चालू आहे तर concret  करून कायमचा वाद मिटवावा
किव्हा प्रशासनास जे योग्य वाटेल तो  निर्णय घेऊन हा वाद कायमचा मिटवावा हि नम्र विंनती , नाही तर दि १ एप्रिल रोजी मी ग्रामपंचायत घोडेगाव समोर उपोषणाला बसणार आहे आणि या दिवशी पासून कोरोणा काळात घोडेगाव मेडिकल असोसियशन च्या वतीने पाठींबा म्हणून पुर्ण वैध्यकीय सेवा बंद राहणार आहेत या काळात उदभवलेल्या वैध्यकीय समस्यांना ग्रामपंचायत जबाबदार राहील.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇