नेवाश्यात सापडला बिबट्याचा 8 महिन्याचा बछडा मृत अवस्थेत.| C24Taas |
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध..👇
नेवासा बुद्रुकच्या शिवारात विक्रम पवार या शेतकऱ्याचे शेतातील ऊसाचे पिकात एक 8 महिन्याचा बिबट्याचा बछडा मृत अवस्थेत आढळून आला आहे.
याबाबद अधिक माहिती अशी की,नेवासा बुद्रुकचे शेतकरी विक्रम पवार यांची भालगाव रस्तावर वस्ती आहे.त्यांच्या शेती गट नंबर 195 मधील ऊसाचे पिकात आज सांयकाळी बिबट्याचा एक बछडा मृत अवस्थेत आढळून आला.त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून याबाबद माहिती दिली.
नेवासा वनपाल मुस्ताक सय्यद,वनकर्मचारी भीमराज पाठक,आसाराम कदम,एस.डी.विधाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
याबद्दल अधिक माहिती देतांना वनपाल श्री.सय्यद यांनी सांगितले की,सदर मृत बिबट बछडा हा
8 ते 10 महिने वयाचा असावा.त्यांचे मानेवर दुसरी प्राण्यांचे पंजाचे वरखडे व त्यामुळे झालेल्या जखमा आढळून आल्या आहेत.त्याचे पेक्षा मोठ्या बिबटशी भांडण झाले असेल किंवा इतर प्राण्याने पंजाने मारले असावे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇




