Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पहिल्याच दिवशी 452 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली. | C24Taas |

               
नेवासा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पहिल्याच दिवशी 452 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली. | C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇


नेवासा तालुक्यात कोरोना बाधितांचा तीन हजाराचा आकडा पार झाल्यानंतर जनसामान्यांमध्ये मात्र कोणत्या प्रकारचा गांभीर्य दिसत नाही या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने मात्र लसीकरणाने वेग घेतला आहे.
आज तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये पहिल्याच दिवशी 452 लसीकरण करण्यात आले दरम्यान याआधी आरोग्य सेवक कर्मचारी व आशा सेविका असे सुमारे एक हजार लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
        नेवासा आरोग्य विभागाचे डॉक्टर योगेश साळुंखे यांनी माहिती देताना सांगितले की शासनाने याआधी प्रत्येकाला ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच लसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे वय वर्ष 60 च्या पुढील आणि वय वर्षे 45 पुढील दुर्धर रोग असणार्‍यांना मोफत लस दिली जाणार आहे. 
यासाठी आज ८ मार्च पासून वरील प्रकारच्या नागरिकांनी आपापले आधार कार्ड व निवडणूक कार्ड घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे आहे या ठिकाणी असलेले कर्मचारी स्वतःच आलेल्या नागरिकाचे रजिस्ट्रेशन करून ताबडतोप लस देणार आहेत तरी या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आली आहे
         आज पहिल्या दिवशी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अनुक्रमे चांदा 30, कुकाना 44, नेवासा बुद्रुक 32, नेवासा खुर्द 76, सलाबतपूर 20, शिरसगाव 97,  सोनई 27, टोका 71 व उस्थळ प्राथमिक आरोग्य केंद्रात 52 जणांना लसीकरण करण्यात आले. याशिवाय नेवासा फाट्यावरील ग्रामीण रुग्णालयात आज अखेर सुमारे 1 हजार लोकांचे लसीकरण झालेले आहे.
आजच्या मोठ्या लसीकरण मोहिमेमध्ये लसीकरण केलेल्या कोणत्याही रुग्णाला कोणत्याही प्रकारची रिॲक्शन आली नाही हे विशेष आहे सदरच्या लस घेतल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याला अर्धा तास दवाखान्यातच निगराणी खाली ठेवले जाते परंतु आज दिवसभरात कोणालाही त्रास झालेला नाही  - डॉ- योगेश साळुंखे

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇