Type Here to Get Search Results !

माळीचिंचोरा शिवारात पाच जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न. | C24Taas |

                

माळीचिंचोरा शिवारात पाच जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न. | C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇


नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा शिवारात पाईपलाईन वरून बैलगाडी घातल्याच्या संशयावरून भावासह पाच जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीघांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     याबाबत दिलेल्या फिर्यादीत भाग्यश्री विशाल बोरुडे  (रा.माळीचिंचोरा ता.नेवासा) यांनी म्हटले आहे की
माळीचिंचोरा शिवारात शेत गट नंबर ३२१ व ३२२ मध्ये पती विशाल,सासू मीरा,सासरे रमेश व दीर निखिल बोरुडे असे एकत्रित कुटुंबात राहतो.शेजारीच चुलत सासरे दत्तात्रय रंगनाथ बोरुडे हे ही कुटुंबीयांसह राहतात.त्यांच्या पाईपलाईन वरून कोणीतरी  बैलगाडी घातली या कारणावरुन दत्तात्रय बोरुडे यांनी फिर्यादी भाग्यश्री बोरुडे यांच्या घरासमोर येवुन शिवीगाळ करु लागले.त्यांना समजावून सांगत असताना फिर्यादी भाग्यश्री यांचे दीर निखील यांना दत्तात्रय बोरुडे यांनी लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरवात केली.
त्यावेळी झालेला आरडाओरडा एकूण दत्तात्रय यांची पत्नी आशाबाई व मुलगा संकेत हा हातात लोखंडी फावडे घेवुन आला त्याने निखील यास डोक्यावर फावडे मारुन गंभीर दुखापत केली.त्याच वेळी दत्तात्रय यानेही दुसरे फावडे आणून भाग्यश्री यांच्या सासु मीरा यांना जीवे मारण्याची धमकी देत ठार मारण्याचे उददेशाने फावडे मीरा यांच्या डोक्यात मारल्याने गंभीर जखमी झाल्याने खाली पडल्या असता आशाबाई हीने मिरा यांना लाथाबुक्याने मारहाण केली तर दत्ताजय याने भाग्यश्री यांचे सासरे रमेश यांचे छातीवर लोखंडी फावडे मारल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दिलेल्या फिर्यादी वरून दत्तात्रय बोरुडे,अशाबाई बोरुडे व संकेत बोरुडे यांच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇