Type Here to Get Search Results !

नेवास - नियम न पाळणार्या मंगल कार्यालयावर कायदेशीर कारवाई करणार - उप विभागीय अधिकारी गणेश पवार| C24Taas |

 नेवास - नियम न पाळणार्या मंगल कार्यालयावर कायदेशीर कारवाई करणार - उप विभागीय अधिकारी गणेश पवार| C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇


नेवासा - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे तो रोखण्यासाठी तालुक्यातील नेवासा पोलीस स्टेशन च्या हद्दीतील सर्व मंगल कार्यालय चालक यांची शासनाच्या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी लक्ष्मी मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उपविभागीय अधिकारी गणेश पवार, पोलीस निरीक्षक विजय करे, मंगल कार्यालय तालुकाध्यक्ष मयुर गोल्हार, लक्ष्मण खंडाळे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत गोपनीय शाखेचे प्रशांत भराट यांनी केले.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक करे म्हणाले की, मंगल कार्यालयात लग्न समारंभ , वाढ दिवस साखरपुडा आदी कार्यक्रमामध्ये ५० व्यक्ती शिवाय जास्त व्यक्ती जमणार नाहीत याची काळजी घ्यावी कार्यक्रमास उपस्थित असणार्या प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरणे बंधनकारक राहिल,विना मास्क व्यक्तीस ५०० रुपये दंड आकारण्यात येईल, प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ऑक्सीमीटर ची व्यवस्था करावी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे जे मंगल कार्यालय नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
उपविभागीय अधिकारी पवार म्हणाले की सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे लग्न व सार्वजनिक समारंभात ५० व्यक्ती पेक्षा जास्त संख्या नसावी वाड्या वस्त्यांवर व गावातील होणार्या लग्न समारंभासाठी शासनाचे नियम लागू आहेत.
सरपंच,तलाठी,ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी शासनाच्या नियमांचे पालन होते का याकडे लक्ष द्यावे.
बैठकीस दिनेश पुलाटे संजय काळे प्रमोद मारकळी बाळासाहेब कंक याच्यासह मंगल कार्यालयाचे चालक व पोलीस पाटील उपस्थित होते. आभार प्रताप दहिफळे यांनी मानले.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇