Type Here to Get Search Results !

सौंदाळा येथील शिबिरात 88 नेत्र रुग्णांची तपासणी. | C24Taas |

 

सौंदाळा येथील शिबिरात 88 नेत्र रुग्णांची तपासणी. | C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇



नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे पुणे येथील के के आय इन्स्टिट्यूट बुधराणी हॉस्पिटल व श्री जगदंबा पावन प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिरात 88 नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरात एकूण 88 रुग्णांची तपासणी झाली असून या पैकी 46 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे आढळून आले. या रुग्णांची  नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात covid-19 टेस्ट करून पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल,पुणे येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 
डॉ.कविता बाळासाहेब आरगडे, गणेश आरगडे,ॲड.आझाद आरगडे व ज्ञानेश्वर  आरगडे यांनी या मोफत नेत्र रोग निदान व मोतीबिंदू शिबिरासाठी परिश्रम घेतले.
शिबिर उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी  ज्येष्ठ कार्यकर्ते  परसराम आरगडे होते. डॉ.मनीषा कोरडे, शरद आरगडे,गोविंद आरगडे,श्रीमती सुभद्राबाई गोरे यांनी  मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास कारभारी आरगडे,लक्ष्मण चामुटे,सचिन आरगडे ,आशिनाथ आरगडे ,विठ्ठल आरगडे, बाळासाहेब बोधक ,कल्याण आरगडे, दत्तात्रय आरगडे,संतोष आरगडे,भागवत आरगडे ,सुदाम आरगडे वसंत आरगडे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

गणेश आरगडे यांनी प्रस्ताविक केले.ॲड.आझाद आरगडे यांनी आभार मानले.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇