नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदी भेंडा येथील डॉ.शिवाजी लक्ष्मणराव शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बाजार समितीचे सभापती कडूबाळ कर्डिले यांची मुळा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला होता.आज झालेल्या बाजार समिती संचालक मंडळाचे
सभेत डॉ.शिवाजी शिंदे यांची या पदावर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख,माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी डॉ.शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇