मंचर शहर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अध्यक्ष पदी सुहास बाणखेले यांची निवड ,तालुक्यात पक्ष वाढीसाठी सर्व ताकतिने काम करणार - सुहास बाणखेले
प्रतिनिधी : अमोल जाधव आंबेगाव
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचर शहर अध्यक्षपदी सुहास बाणखेले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर उद्योजक व शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या हस्ते बाणखेले यांचा सत्कार करण्यात आला.
मंचर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढावी या दृष्टीने नवीन व तरुण चेहरा युवकांचे संघटन व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सुहास बाणखेले यांची निवड करण्यात आली आहे।बाणखेले यांचे मंचर शहर व तालुक्यात चांगले काम आहे. त्या दृष्टीने कामगार व उत्पादन शुल्कमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेवरून सुहास बाणखेले यांची निवड झाली आहे.पुढील काळात मंचर शहरात पक्षवाढीसाठी सर्व ताकती निशी प्रयत्न करणार असल्याचे सुहास बाणखेले यांनी सांगितले.
मंचर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात झालेल्या या निवड प्रकिया प्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेडे,माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले,दत्ता थोरात,राजाभाऊ थोरात, मावळते अध्यक्ष राहुल पडवळ,बाळासाहेब थोरात,संतोष गावडे,लक्ष्मण थोरात,संजय थोरात,गणपत क्षीरसागर,मेहुल भंडारी,अमित पुनमिया आदी उपस्थित होते.


