श्रीगोंदा प्रतिनिधी :जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज निरागस महिला ग्रामसंघ वडाळी व श्रीगोंदा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संयुक्त विदयमाने वडाळी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार समारंभ व " महिला सुरक्षा जनजागर" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून adv. दिपाली ताई बोरुडे यांनी उपस्थित सर्व महिलांना महिलांचे हक्क-अधिकार, कर्तव्य तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी कश्या पध्दतीने कामकाज केले पाहिजे यावर मार्गदर्शन करून सर्व नवनिर्वाचित सदस्यांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ग्राम संघाच्या सर्व सदस्यांनी ग्राम स्वच्छता मोहीम हाती घेऊन महादेवमंदिर परिसर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर स्वच्छ केला एक स्वच्छते चा आदर्श घडवून आणला.यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मनिषा घनश्यामअण्णा शेलार, सौ. मृणालिनी बाळासाहेब शेलार, माजी सरपंच रवीकाटे सो,माजी सरपंच सुप्रियाताई वागस्कर तसेच नवनिर्वाचित उपसरपंच विकास वागस्कर, सदस्य वागस्कर सर , सदस्य संचीता शिंदेताई, सदस्य सी आर वागास्कर सर आशाताई शेलार, रानीताई डांगे व १७ बचतगटाच्या सदस्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या महिलांनी करोना च्या पार्श्वभूमीवर मास्क व सॅनिटायझर चा वापर केला तसेच सोशल डिस्टंसिंग या सर्व नियमांचे पालन केले
