Type Here to Get Search Results !

घोडेगाव-भिमाशंकर रोडवर चिंचपुरेमळा मंचर येथे टेम्पो आणि दुचाकीचा भिषण अपघात,अपघातात दुचाकी चालक जागीच ठार


               बाबाजी शिवाजी निघोट,वय -40                            रा. निघोटवाङी ता:-आंबेगाव.जि-पुणे
दि.१२/३/२०२१
प्रतिनीधी-
अमोल जाधव,आंबेगाव 
घटना अशी,टाटा कंपनीचा 1109 टेम्पो नंबर MH 14 CP 6501 घोडेगाव कडुन मंचरच्या दिशेने जात होता.तर मोटारसायकल स्वार बाबाजी शिवाजी निघोट बजाज कंपनीची प्लाटिना गाडी घेऊन मंचर वरुन निघोटवाडिला घरी चालले होते.या दोन वाहनांचा अपघात रात्री १० वा तपनेश्वर महादेव मंदिर जवळ चिंचपुरेमळा येथे झाला .या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला आहे.बाबाजी शिवाजी निघोट असे अपघातात निधन पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाबाजी शिवाजी निघोट हे हाडाचे शेतकरी व मंचर मधिल नामांकीत हाँटेल व्यवसाईक होते.