Type Here to Get Search Results !

शीर्षक नाही

बी.डी.काळे महाविद्याल येथे यशवंतराव चव्हाण जयंती साध्या पध्दतीने साजरी…


घोडेगाव –  येथील आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बी.डी.काळे महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त  विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राच्या वतीने आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण यांना जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.इंद्रजित जाधव यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून यशवंतराव चव्हाण  यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करून दिले. याप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राचे केंद्रसंयोजक प्रा.सुनील नेवकर, ग्रंथपाल श्री.कैलास उंबरे,विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा. नितीन वाघ, प्रा.आशिष खोकराळे, प्रा.दिनेश गवारी हे उपस्थित होते.



Tags