हॉटेलवर अवैधरीतीने दारू सप्लाय करण्याऱ्या म्होरक्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन जेरबंद !
दौंड प्रतिनिधी (संजय सोनवणे) - दौंड तालुक्यात कानगाव येथे रविवार दि २१ मार्च रोजी हातवळन-कानगाव रोड प्राथमिक शाळेच्या जवळगाडी क्र MH17 AJ5724 या कारमध्ये २,४३,००० रुपये किंमतीच्या कारमधून वाहतूक करणारे अवैध मद्य राज्य उत्पादन शुल्क विभाकडुन पकडण्यात आले.
सदर ही गाडी १ वर्षापासुन तांदळी,मांडवगण फराटा, वडगाव रासाई,काष्टी,श्रीगोंदा या परिसरातून ग्रामीण भागातील बेकायदेशीर ढाब्यांना दारू पुरवत
होती.मांडवगण ते कानगाव दिशेने आठवड्यातून दोन
वेळा प्रवास करत होती अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना नागरिकांनी दिली.
सदर या घटनेची माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम पोलिस निरीक्षक एस.के कान्हेकर,निरिक्षक बि.व्ही ढवळे,विकास थोरात,सतीश काळभोर,जवान चंद्रकांत इंगळे,मोहन गवळी, सोहन मालुसरे,नवनाथ पडवळ आदींनी बेकायदेशीर दारू वाहून नेणारा चालक प्रशांत अरूणभाऊ भोर व्यक्तीस राहणार काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यास अटक केली असून,नागरिकांनी माहिती दिल्याबद्दल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांचे आभार मानले.दौंड तालुक्यामध्ये कानगाव, हातवळन, कडेठान, पारगाव, नानगाव, पिंपळगाव, राहु व पुर्व भागात राजेगाव, आलेगाव, खोरवडी,लिंगाळी ग्रामीण भागातील ढाब्यांवरती मोठी कारवाई करण्याची मागणी दौंड तालुका दारू बंदी कृती समिती व महिलावर्गाकडून होत आहे.

