Type Here to Get Search Results !

नेवासा - मागील ५ वर्षात काम कमी मात्र नारळ फोडण्याचाच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात - उदयन गडाख. | C24Taas |

सोनई परीसरातील रस्त्यांचे उदयन गडाखांच्या हस्ते उदघाटन.| C24Taas |

सोनई येथील मुळागट ते ४ नंबर चारी रस्त्याचे खडीकरण कामाचे उदघाटन करताना उदयन गडाख.

बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇


नेवासा तालुक्यातील सोनई परीसरातील नवनाथनगर, बेल्हेकरवाडी,हनुमानवाडी व मुळा गट परीसरातील विविध रस्त्यांचे उदघाटन युवानेते उदयन गडाख यांच्या हस्ते करण्यात आले. 
मुळा गट ते ४ नंबर चारी खडीकरण रस्त्याचे उदघाटन झाल्यानंतर परीसरातील ग्रामस्थांची बैठक झाली.मागील आमदाराने नेवासा तालुक्यात काम कमी व नारळ फोडण्याचाच कार्यक्रम मोठ्या प्रमाणात केला.काम कमी आणि गप्पा जास्त अशी अवस्था ५ वर्ष सर्वांना सोसावी लागली.अशी टीका युवानेते गडाख यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव न घेता केली.
बैठकीस शनैश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त एकनाथ दरंदले,व्यावसायिक गोरख दरंदले, सोनईचे सरपंच धनंजय वाघ, उपसरपंच प्रसाद हारकाळे, माजी सरपंच राजेंद्र बोरुडे, उदय पालवे,मच्छिंद्र कुसळकर, भानुदास कुसळकर, नागेश गर्जे, पी.टी.कुसळकर, लक्ष्मण दरंदले उपस्थित होते. 
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या निधीतून झालेल्या कन्हेरवस्ती,नवनाथनगर,मुळा गट परीसर, बेल्हेकरवाडी,हनुमानवाडी येथील  रस्त्यांचे उदघाटन
गडाख यांच्या हस्ते झाले. यापुढे सोनई भागातील वीज,पाणी व रस्ते या मुलभुत प्रश्नाला अग्रक्रम देण्याचे काम करु.जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विकास कामे केली जातील.असेही गडाख यांनी सांगितले. 

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇