Type Here to Get Search Results !

मोठी बातमी : रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे पोलिसांच्या ताब्यात. | C24Taas |

 

मोठी बातमी : रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार बाळ बोठे पोलिसांच्या ताब्यात. | C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇


अहमदनगर - सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेला हैदराबादमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला घेऊन पोलिस पथक नगरकडे रवाना झाले आहेत. त्याला मदत करणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे. 
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधीक्षक पाटील आज शनिवारी सकाळी १० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.३० नोव्हेंबर रोजी पुणे-नगर मार्गावर जातेगाव घाटात दुचाकीस्वारांशी वाद झाल्यानंतर जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती.
 रेखा जरे या पुणेहून नगरकडे परतत असताना त्यांच्या वाहनाला एका दुचाकीस्वाराने धडक दिली. त्यानंतर वादावादी सुरू करून त्यांच्या गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली होती. प्रथमदर्शनी वादावादीतून ही हत्या झाल्याचे समोर आले होते. मात्र, पोलिस तपासात खूनाची बाब समोर आली. गेल्या तीन महिन्यांपासून बोठे फरार होता. वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकूनही पोलिसांना तो सापडत नव्हता. तो हैदराबाद येथे लपला असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक पाटील आणि तपास अधिकारी अजित पाटील यांनी पाच विशेष पथके तपासासाठी रवाना केली होती. त्यामध्ये बोठेसह तिघेजण हाती लागले.
बोठेला घर भाड्याने मिळवून देणे, मोबाईल फोन उपलब्ध करून देणे, पैसे पुरविणे अशा प्रकारची मदत या संशयित आरोपींनी केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बोठेसोबत त्यांनाही अटक होत आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇