Type Here to Get Search Results !

श्री.खंडोबा देवस्थानचे क्षेत्र कारखान्याने पुन्हा द्यावे.पारगाव शिंगवे ग्रामपंचायतने केली भीमाशंकर कारखान्याकडे मागणी


श्री.खंडोबा देवस्थानचे क्षेत्र कारखान्याने पुन्हा द्यावे
पारगाव शिंगवे ग्रामपंचायतने केली भीमाशंकर कारखान्याकडे मागणी 

प्रतिनिधी : अमोल जाधव,आंबेगाव

पारगाव शिंगवे ता. आंबेगाव येथील भीमाशंकर कारखानाच्या हद्दीत असलेल्या श्री क्षेत्र सोनमाळ खंडोबा देवस्थान मंदिर असून या मंदिरासाठी राखीव असलेले पाच एकर क्षेत्र हे 1996 च्या सालात ग्रामपंचायत सभा ठरावानुसार भीमाशंकर सहकारी साखर कारखाना याना वापरण्यासाठी दिले होते. मात्र सध्या या मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम ,तसेच लग्नविधी कार्यक्रमास जागा कमी पडत असल्याने भीमाशंकर कारखान्यांने देवस्थानचे पाच एकर क्षेत्र पुन्हा देवस्थान ला परत द्यावे अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे.याबाबतचे निवेदन ग्रामपंचायत सदस्य किरण शांताराम ढोबळे यांनी भिमाशंकर सहकारी साखर कारखाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढगे यांना दिले असून त्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे ढोबळे यांनी सांगितले आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम वैद, सचिन देवडे,श्रीकांत लोखंडे, अनिल शेवाळे, गणेश ढोबळे.आदि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


१९९६ साली ज्या वेळी कारखाण्याला जमीन हस्तांतरण करायची होती तेव्हा ग्रामपंचायतचा ठराव कलेक्टर साहेबांना पाठवायचा होता तेव्हा ग्रामपंचायत ने पुर्ण गायरण जमीनी पैक्की पाच एकर जमीन श्री सोनमाळ खंडोबा देवस्थान साठी राखीव ठेऊन बाकी जमीन कारखाण्याला देण्यात यावी, असा ठराव असताना कारखान्याने आज तागायत ही जमीन वापरली असून देवस्थान ची गरज लक्षात घेता कारखाना प्रशासनाने ठरलेल्या ठरावाप्रमाणे जमीन देवस्थान च्या ताब्यात देण्यात, यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य किरण शांताराम बापु ढोबळे यांनी केली आहे.



पारगाव शिंगवे ग्रामपंचायतने केली भीमाशंकर कारखान्याकडे मागणी