Type Here to Get Search Results !

नेवासा - डाॅ.सायली लिपाणे एमडी परिक्षेत उत्तीर्ण .| C24Taas |

डाॅ.सायली लिपाणे एमडी परिक्षेत उत्तीर्ण .| C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇



नेवासा -  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक)चे वतीने घेण्यात आलेल्या एमडी अंतिम वर्ष परिक्षेत नेवासा तालुक्यातील सोनई येथील डाॅ.सायली संदीप लिपाणे यांनी यश प्राप्त करुन पदवी प्राप्त केली आहे. 
सोनई येथील साईदिप मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक संदीप लिपाणे यांच्या त्या पत्नी आहेत.प्रवरा मेडिकल ट्रस्ट(शेवगाव)च्या आयुर्वेदिक महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
सोनईत डाॅ.सायली लिपाणे या एमडी पदवी घेणा-या
पहिल्या महिला डाॅक्टर ठरल्या आहेत. 

    डाॅ.लिपाणे यांना डाॅ.व्हि.डी.दिवे,डाॅ.प्रा.बी.टी.शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल त्यांचे परीसरातून अभिनंदन होत आहे. या शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांसाठी विशेष योगदान देत भविष्यात महिलांचे स्वतंत्र शिबीर आयोजित केले जाईल. असे डाॅ.लिपाणे यांनी सांगितले. 


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇