नेवासा - शिष्यवृत्तीचे वर्ग सुरू न करणेबाबत शिक्षक समितीने दिले निवेदन ; लेखी आदेश देण्याची केली मागणी.| C24Taas |
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध..👇
माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना ईमेल द्वारे पाठविण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने खबरदारी म्हणून माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व वर्ग बंद करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत . जिल्हा परिषद प्रशासनाकडून पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा 23 मे रोजी होणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे .आतापर्यंत मुलांना शिष्यवृती संदर्भात शिक्षकांनी मार्गदर्शन केले व करत आहेत .
काही तालुक्यात मुलांना सराव परीक्षेच्या नावाखाली केंद्र शाळेत एकत्रित केले जाते . शिक्षकांनाही त्यासाठी एकत्र यावे लागते . सध्याच्या परिस्थितीत ही बाब अत्यंत जोखमीची आहे . या सर्व गोष्टी तोंडी आदेशानुसार केल्या जातात . शिक्षण विभागाने या बाबतीत कुठलाही लेखी आदेश काढलेला नाही . दुर्देवानं कोविड संसर्गासारखी एखादी घटना घडल्यास त्यासाठी आपण शिक्षकांनाच जबाबदार धरणार आहात . त्यामुळे अशा सर्व सराव परीक्षा अथवा वर्ग भरवण्यास शिक्षकांवर तोंडी आदेशाने सक्ती करु नये . यापुढे स्पष्ट लेखी निर्देश काढावेत . कुठल्याही तालुक्यात अशी सक्ती झाल्यास मा . जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार करण्यात येईल . मा .जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाची पायमल्ली करू नये असेही या निवेदनात म्हटले आहे .

निवेदनावर शिक्षक नेते संजय कळमकर ,शिक्षक समिती राज्य उपाध्यक्ष रायाजी औटी, जिल्हाध्यक्ष संजय धामणे ,उच्चाधिकार चे अध्यक्ष नितीन काकडे ,गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन शिंदे ,कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे ,संजू नळे, सरचिटणीस सिताराम सावंत यांच्या स्वाक्षर्या आहेत.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇





