नेवासा तालुका पुन्हा कोरोनाच्या संख्याने धास्तावला ; 2 एप्रिल रोजी 72 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह.| C24Taas |
नेवासा तालुक्यात दिवसेंदिवस वाढत्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीने प्रशासन आता तरी सतर्क होईल का? असा प्रश्न नागरिकांना पडला. अहमदनगर जिल्ह्यतील रुग्णवाढीबरोबरच नेवासा तालुक्यात गेल्या 24 तासात 72 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांसह प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. गेल्या महिनाभरापासून तालुक्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असून त्यावर नियंत्रण आणण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध..👇
- जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 13
- खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 24
- रॅपिड अँटीजेनच्या आलेल्या अहवालात - 35

02 एप्रिल रोजी दुपारी 3 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3698 झाली आहे. तर आज रोजी - रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज 0 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 3090 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 57 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇






