Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री जनतेशी संवाद साधणार ; मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्यामुळे राज्य सरकार आज मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज २ एप्रिलला रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या संवादात मुख्यमंत्री कोणता निर्णय जाहीर करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


कोरोनाच्या संदर्भात आज दिवसभर राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांच्या बैठका सुरू असून दुपारी साडेचार वाजता सह्याद्री अथितीगृहात मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांसोबत कोरोना आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर संध्याकाळी देखील मुख्यमंत्री उच्चस्तरीय बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधून कोरोना संदर्भात महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.