नेवासा - उद्या बाजार बंद ; दुकाना संदर्भात तहसीलदार,नगराध्यक्ष यांनी दिली ही माहिती.| C24Taas |
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध..👇
अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्या वतीने वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील आठवडे बाजार 15 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेश काढला आहे.
या आदेशाचे पालन करत नेवासा शहरामध्ये होणाऱ्या गर्दीला पायबंद घालण्यासाठी उद्या रविवार 4 एप्रिल रोजी होणारा आठवडे बाजार बंद राहणार आहे. मात्र भाजी मंडईत दररोज बसणारी व्यावसायिकच उद्या भाजी विक्रीसाठी असतील तसेच शहरातील व्यवसायिक दुकाना शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे चालू राहतील अशी माहिती नगरपंचायतच नगराध्यक्ष सौ.योगिता पिंपळे यांनी दिली.
उद्या आठवडा बाजार बंद राहणार मात्र व्यवसायिक दुकाना चालू राहतील जर उद्या शहरात गर्दी झाली तर पुढील रविवारी दुकानात बंद ठेवण्यासंदर्भात व्यापार्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी सांगितले.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇




