Type Here to Get Search Results !

ब्रेकिंग न्यूज - महाराष्ट्रातील लॉकडाऊन बाबत घोषणा..! | C24Taas |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत घोषणा करण्यात आली.

राज्यात उद्यापासून कडक निर्बंधलावण्यात येणार आहेत. तसेच शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्य़ात येणार असल्याची घोषणा राज्याचे मंत्री नवाब मलिकांनी केली आहे. 

यामध्ये आठवड्याचे 5 दिवस कडक निर्बंध आणि शनिवार-रविवार कडक लॉकडाऊन करण्यात येण्याबाबत निर्णय घेण्यात आला. उद्या सायंकाळी 8 वाजल्यापासून नियमावली लागू होईल. उद्योग व्यवसायांना कंपनीच्या वेळा ठरविण्यात येणार आहेत. गृहा निर्मनाची कामे , रिक्षा टॅक्सी, भाजी मंडी, हॉटेल रेस्टॉरंटची पार्सल सुविधा, सह अत्यावश्यक सेवा सुरू राहणार, सर्व धार्मिक स्थळे, राजकीय कार्यक्रम, सर्व मॉल्स रेस्टॉरन्ट आणि बार, खेळण्याची मैदान, उद्यान, सिनेमागृहे, नाट्यगृह बंद राहणार आहेत.  कंपन्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडला तर त्याची जबाबदारी कंपनी मालकाची असेल. रात्रीच्या वेळी अत्यावश्यक सेवांनाच संचार करण्यास मुभा देण्यात येणार आहे.