Type Here to Get Search Results !

नेवासा - विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच कोरोना टेस्ट होणार ; पॉझिटिव्ह आढळल्यास कोविड केंद्रात भरती.| C24Taas |

नेवासा - विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच कोरोना टेस्ट होणार ; पॉझिटिव्ह आढळल्यास कोविड केंद्रात भरती.| C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇


नेवासा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग थांबविण्‍यासाठी संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्यांची जागेवरच रॅपिड अँन्‍टीजन टेस्ट करण्‍याचा उपक्रम प्रशासनाने हाती घेतला आहे. त्यामुळे एखाद्या बाधित व्यक्तीकडून इतर कुणालाही कोरोनाची लागण होऊ नये यासाठी हा टेस्ट करण्‍याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
संचारबंदीत विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या बेजबाबदार कोरोनाचा प्रसार करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी रॅपिड टेस्ट करण्याचा उपक्रम नेवासा तहसीलदार, पोलिस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, यांनी संयुक्त हाती घेतला आहे. 
त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणारे जे नागरिक आहेत त्यांना त्यांचा मोह आवरावा लागेल जे नागरिक स्वतः पॉझिटिव्ह आहेत परंतु त्यांना कमी प्रमाणात त्रास होत आहे किंवा त्रास होत नाहीये असे लोक हे समाजामध्ये सर्वात जास्त कोरोनाव्हायरस चा प्रसार करू शकतात अशी एकंदरीत एक बाब जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आली आहे.
रस्त्यावर उतरून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय करे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यवंशी, नेवासा नगरपंचायत मुख्यधिकारी समीर शेख यांच्‍यासह आरोग्य विभागाच्या मदतीने विनाकारण फिरणा-यांची अँन्टीजन चाचणी केली जाणार आहे.
पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या व्यक्तींना तत्काळ कोविड केअर केंद्रात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. सदरची माहिती फक्त त्यांचे नातेवाईकांना देण्यात येईल.
याची सर्व जनतेने नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇