Type Here to Get Search Results !

नेवासा - नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा - पोलीस निरीक्षक विजय करे.| C24Taas |

नेवासा -  नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा - पोलीस निरीक्षक विजय करे.| C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध..👇



नेवासा शहरातील वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा बैठक आज रविवार 18 एप्रिल रोजी प्रशासकिय आधिकारी, पोलीस निरीक्षक, नगरसेवक,  प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, व नगरपंचायत विभागाचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत नेवासा पोलीस ठाण्याच्या आवारात सायंकाळी 6 वाजता बैठक घेण्यात आली. यावेळी नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे यांनी शहरातील नागरिकांना कडून लॉकडाऊन काळात सहकार्याची अपेक्षा पोलिसांना असेल तसेंच शहरातील नगरसेवक यांच्या पाठीमागे मोठा मानणारा वर्ग आहे. तसेंच प्रभागातील नागरिकांची परिस्थितीची माहिती सर्व नगरसेवकांना आहेंच वेळ प्रसंगी एकत्रित येऊन कामं करू कडक लॉक डाऊन झाल्यास सर्वांना रस्त्यावर उतरून काम करावे लागणार  फिल्ड वर काम करताना कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता पोलिसांकडून घेतली जाईल तसेच नागरिकांनी निष्काळजीपणाने गावांत फिरू नये. व कायद्याचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करणार असे या वेळी पोलीस निरीक्षक विजय करे म्हणाले. 

यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे संजय सुखदान, शांतता कमिटीचे आसिफ पठाण, नगरसेवक अल्ताफ पठाण, सचिन नागपुरे, सचिन वडागळे, राजेंद्र मापारी, संदीप बेहळे, रणजित सोनवणे ,नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष रमेश शिंदे , ज्येष्ठ पत्रकार अशोक डहाळे, मोहन गायकवाड, शंकर नाबदे, पवन गरुड, नवनाथ जाधव , नेवासा पोलीस स्टेशनचे कर्मचारी व नेवासा नगरपंचायतचे राजेंद्र सोनवणे, परशुराम डौले हे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

मागील वर्षीच्या आठवणींना पोलीस निरीक्षक करे यांनी दिला उजवळा भविष्यात गरज भासल्यास मदतीसाठी वेब साईट ची संकल्पना राबविली तर नागरिकांच्या विनंती वरून  गोरगरीब गरजू  नागरीकांना सहंकार्य करता येईल लॉक डाऊन च्या काळात फूड पॅकेट, रेशन लंगर चालू करण्याची तयारी ठेवावी लागेल.

सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत भाजीपाला व फळे विक्रेत्यांनी शहरात फिरून शिस्तबद्ध पद्धतीने भाजीपाला व फळे विक्री करावी असे आव्हान तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, नगरसेक यांनी केले आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇