Type Here to Get Search Results !

बापरे बाप : नेवासा तालुक्यात कोरोनाचा भडका ; आज सोमवारी 303 रुग्णांची वाढ. | C24Taas |

नेवासा तालुक्यात आज सोमवारी 303 रुग्णांची वाढ. | C24Taas |



नेवासा तालुक्यात गेल्या काही दिवसापासून दररोज आढळणारी रुग्ण सख्या ही 100 ते 200 पर्यंत रुग्ण आढळत होते. मात्र आज पहिल्यांदाच तीनशेहून अधिक रुग्ण तालुक्यात आढळून आले आहे. त्यामुळे यावरूनच लक्षात येतं की तालुक्यातील नागरिक शासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमाचे पालन कितपत करत असतील..!

जिल्हा रुग्णालयातून आलेल्या अहवालात - 189
खाजगी प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात - 53
रॅपिड टेस्टच्या आलेल्या अहवालात - 69


-: नेवासा तालुका :-
रुग्ण संख्या - 8586
बरे रुग्ण संख्या - 6976
ॲक्टिव्ह रुग्ण - 1498
मृत्यू -  112


10 मे रोजी सायं 7 पर्यंत नेवासा तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8586 झाली आहे. तर आज रोजी 1498 रुग्ण उपचार घेत आहे. तसेच आज 08 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आजपर्यंत 6976 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर तालुक्यात 112 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇