माका येथील जवान नवनाथ भुजबळ यांचे जम्मूमध्ये हृदय विकाराने निधन. | C24Taas |
नेवासा तालुक्यातील माका येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान नवनाथ रभाजी भुजबळ (वय 35 वर्षे) यांचे आज लेह ( जम्मू ) येथे हृदविकारने निधन झाले.
जवान नवनाथ यांचे कुटुंबियांनी दिलेल्या माहिती नुसार नवनाथ हे 15 दिवसांपूर्वी माका येथून ड्युटीवर गेले होते. कालच त्यांची चंदीगड हुन जम्मू ला बदली झाली होती.लेह मधील त्यांचा ड्युटीचा आजचा पहिलाच दिवस होता.
आज सोमवारी दि.10 मे रोजी सकाळी 6 वाजता सैन्य दलाकडून नवनाथ च्या कुटुंबियांना मोबाईल वर फोन आला असता त्यांनी नवनाथचा हृदय विकाराचे झटक्याने निधन झाल्याचे कळविले.जम्मू हुन विमानाने पुण्याला व पुण्याहुन लष्करी वाहनाने जवान नवनाथ चा मृतदेह माका ता.नेवासा येथे आणला जात आहे.

अंत्यविधी उद्या मंगळवारी दि.11 मे रोजी दुपारी नेवासा तालुक्यातील माका येथे होणार आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇