Type Here to Get Search Results !

टाकळी ढोकेश्वर - कोरोना संकटात अमोल साळवे बनले समाजासाठी 'देवदूत'.

टाकळी ढोकेश्वर - कोरोना संकटात अमोल साळवे बनले समाजासाठी 'देवदूत'.

स्वमालकीच्या शाळेत तयार केले कोविड सेंटर ; आता करतोय घरदार सोडून 24 तास रुग्णसेवा!


विनोद गायकवाड, टाकळी ढोकेश्वर : गेल्या दोन महिन्यापासून पारनेर तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे.तालुक्यात रोजच्या रोज शकडो रूग्ण सापडत आहे.अनेक कुंटुंब या साथीत कोसळून गेले आहेत.अश्या परिस्थितीत रूग्णांना बेड-औषधे या साठी अनेक अडचणींचा सामना करावा,लागत आहे.या संकटात टाकळी ढोकेश्वर गणाच्या पंचायत समितीच्या सदस्या सौ.सुप्रियाताई अमोल साळवे व त्यांचे पती युवक नेते अमोल साळवे हे आधार म्हणून साथ देत आहे.

कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही सामाजिक भावना मनात ठेवून. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील अमोल साळवे हे २४ तास कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. अमोल साळवे यांनी स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या विचारांना आदर्श मानून टाकळी ढोकेश्वर येथे त्यांनी व त्यांचे सहकारी प्रा.सागर हांडे सर यांनी त्यांच्या मालकीची असलेली प्रियदर्शनी पब्लिक स्कूल या शाळेत ३०० बेड'चे अद्यावत असे सर्व सुख सुविधा युक्त कोरोना सेंटर सुरू करण्यासाठी दिली आहे. त्याठिकाणी अमोल साळवे स्वतः आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांची मनोभावे सेवा करत आहेत. सामाजिक कामाची पहिल्यापासूनच अमोलला आवड आहे. समाजात राहून काम करत राहणे आणि  समाजाची सेवा करणे हेच  आपल्या जीवनाचे सध्या आमोलने  ब्रीद मानले आहे. 

  झावरे पाटील परिवारावर असलेल्या प्रेमामुळे टाकळी ढोकेश्वर येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूल येथे आपल्या स्वतःच्या शाळेमध्ये स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील  यांच्या नावाने कोरोना सेंटर  सुरू करून आपल्या टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरी परिसरातील आदिवासी पट्ट्यातील  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना तसेच समाजातील दुर्बल घटकांना त्याठिकाणी कोरोना या आजारावर उपचार उपलब्ध करून दिले आहेत. या रुग्णांची अमोल साळवे हा युवक २४ तास सेवा करत आहे. रुग्णांची  अगदी घरच्या सारखी काळजी घेत आहे.  कोरोना रुग्णांच्या करमणुकीसाठी आणि रुग्णांचे मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी कोरोना सेंटरमध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत.  स्वर्गीय आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या विचारांचा वारसा असलेले व सामाजिक भान असलेले  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीतराव झावरे पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले रुग्णसेवेचे हे काम कोरोनाचे वाढते संकट ओळखून समाजहितासाठी सुरू आहे.   अमोल साळवे हा कोणत्याही प्रकारे प्रसिद्धीसाठी काम करत नसून समाजामध्ये राहून समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हीच सामाजिक भावना मनात ठेवून अमोलने स्वतःला या रुग्ण सेवेमध्ये वाहून घेतले आहे.

मध्यमवर्गीय कुटुंबातील अमोल प्राथमिक शिक्षक असून अमोल'ची पत्नी सुप्रिया अमोल साळवे या टाकळी ढोकेश्वर पंचायत समिती गणातून पंचायत समिती सदस्य आहेत. अमोलने पंचायत समितीच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गट व गण यामध्ये अनेक विकासात्मक कामे मार्गी लावले आहेत आता कोरोनाच्या संकटातही अमोल एक पाऊल पुढे राहून समाज सेवेचे हे व्रत हाती घेऊन  कोरोनाग्रस्तांची रुग्णसेवा करत आहे.   अमोल साळवे हे स्वतःचा जीव धोक्यात घालून करत असलेली ही  रुग्णसेवा पाहून अमोलचे मित्र, नातेवाईक, हितचिंतक कार्यकर्ते, अमोलच्या या कामाचे कौतुक करत आहेत. आपल्या भागात राहणाऱ्या आदिवासी  समाजासाठी काम करत असताना अमोलने आत्तापर्यंत विविध शासकीय योजना या समाजासाठी  राबविल्या आहेत आदिवासींसाठी अमोल हा खऱ्या अर्थाने एक देवदूतच आहे. आपली आदिवासी जनता कि आता कोरोनाच्या संकटात सापडली आहे हे पाहून अमोल ने पारनेर तालुक्याचे खऱ्या अर्थाने विकास पुरुष असलेले स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या विचारांना आदर्श मानून त्यांच्या नावानेच कोरोना सेंटर सुरू करून आदिवासी समाजातील  कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची सेवा करत आहे. समाजामध्ये राहुन  निस्वार्थ व प्रामाणिक सेवा करत असलेल्या अमोल साळवे या युवकास C24TAAS NEWS कडून खूप साऱ्या शुभेच्छा... 


लहान मुलांना व वृध्दांना लागला अमोल भाऊंचा लळा !

स्वतः पेशाने शिक्षक असलेले अमोल साळवे हे कोव्हिड सेंटर मध्ये दाखल असलेल्या लहान मुलांना विविध अक्टिव्हिटी शिकवत असून तेथे असणाऱ्या वृद्ध माता यांच्याकडून जात्यावरच्या ओव्या गाऊन घेतात, त्या मुळे लहान,वृध्दांना त्यांचा लळा लागला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे मानसिक संतुलन चांगले राहण्यासाठी त्यांच्यासाठी विविध उपक्रम घेत आहे. अशाप्रकारे अमोल साळवे हा रुग्णांची मनोभावे सेवा करत आहे आणि कोरोनाच्या संकटात आरोग्य सेवेच्या माध्यमातून तो समाजातील गरीब व दुर्बल दिन दलित आदिवासी घटकांसाठी देवदूतच बनला आहे.]


स्वतःच्या जीवाची व घरची पर्वा' न करता समाजसेवा !

अमोल साळवे हा प्राथमिक शिक्षक असून  मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या अमोल चे  वडील सुखदेव व आई शोभा वृद्ध आहेत तर घरी पत्नी सुप्रिया व दोन लहान मुले आहेत अमोल ची मुलगी केवळ नऊ महिन्याचीच आहे तरीही या कोरोनाच्या महाभयंकर संकटात जीवाची कोणत्याही प्रकारे पर्वा न करता समाजसेवेचे वेड लागलेला अमोल कोरोनाग्रस्तांसाठी  दिवस-रात्र एक करत आहे. या सर्व  आरोग्यसेवेमध्ये कुटुंबाचा अमोलला मोलाचा आधार असून पाठिंबा आहे.  अमोलने स्वतःला वाहून घेतलेल्या या समाजसेवेच्या कामाचे समाजातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.]


सहकाऱ्यांनी ही दिला मदतीचा हात ! 

कोव्हिड केअर सेंटर मध्ये आज पर्यत ११० रूग्ण दाखल झाले असून ३०च्या वर रुग्ण सुखरुप ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.रुग्णांसाठी अमोलभाऊ साळवे व त्यांचे सर्व सहकारी दिवसराञ मेहनत घेत आहे.रूग्णांना अॕडमिट करुन घेण्यापासून ते त्यांना सर्व सुविधा-उपचार पुरावण्यासाठी अमोल साळवे हे स्वतः तिथे अहोराञ कर्तव्य करत असतात. स्व.वसंतराव झावरे पाटील कोव्हिड केअर सेंटर हे टाकळी ढोकेश्वर परिसर व पारनेर तालुक्यातील,रुग्णांसाठी एक आधार केंद्र बनले आहे. जि.प.चे माजी उप.अध्यक्ष सुजित पाटील झावरे व देवकृपा प्रतिष्ठाणचे अनेक सहकारी या सेंटर साठी अथक परिश्रम घेत आहे.