Type Here to Get Search Results !

बौद्ध समाजाच्या पुर्वजांच्या समाधी उध्वस्त करणाऱ्यांची चौकशी करून ऑट्रोसिटी अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी.

बौद्ध समाजाच्या पुर्वजांच्या समाधी उध्वस्त करणाऱ्यांची चौकशी करून ऑट्रोसिटी अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी.

पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथे वार्ड क्रमांक 4 येथील बौद्ध समाजाचे दहन दफन भुमी मधील बौद्ध समाजातील पूर्वजांच्या समाध्या होत्या त्या ठिकाणी समाधी असल्यामुळे तेथुन रस्ता काढण्यासाठी चा प्रयत्न घोडेगाव ग्रामपंचायत करत असल्याचे कळल्यावर भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष किशोर वाघमारे यांनी व बौद्ध समाजातील नागरिकांनी या दहन दफनभूमीतून जाणाऱ्या रस्त्याविषयी हरकत असल्याचा अर्ज दिनांक 22 2 2019 या तारखेस दिला होता

 या दहन दफन भूमी मध्ये आमच्या पूर्वजांच्या समाध्या आहेत पूर्वजांच्या समाध्यांना  धक्का लागल्यास आमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात या जागेतून रस्ता काढण्यास आमची हरकत आहे व त्याची माहिती साठी प्रत माननीय गटविकास अधिकारी यांना दिली होती परंतु घोडेगाव ग्रामपंचायत ने लॉक डाऊनचा गैरफायदा घेत सरपंच उपसरपंच ग्राम विकास अधिकारी यांनी जाणून बुजून आमच्या पूर्वजांची समाधी उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी रस्ता काढलेला दिसून येत आहे हा बौद्ध समाजावर  मोठा अन्याय आहे . 

घोडेगाव ग्रामपंचायतने बौद्ध समाजाला संरक्षण द्यायच सोडून इथे मात्र अन्याय करत असल्याचे दिसून येत आहे म्हणून  या घटनेला जे कोणी दोषी असेल त्यांची चौकशी करून त्यांच्यावर ऍट्रॉसिटी अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करावी . अशी मागणी आंबेगाव तालुका भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष किशोर वाघमारे यांनी केली आहे व शासनाने लवकरात लवकर या दोषींवर कारवाई करावी अन्यथा येत्या काळात आंदोलन करण्यात येईल.