नेवास - जिल्ह्यासाठी साडेसात हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध होणार - मंत्री शंकरराव गडाख
नेवासा - खरीप हंगामासाठी येत्या आठ दिवसात जिल्ह्यासाठी ७ हजार ५०० मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध केले जाणार आहे, अशी माहिती मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
खरीप हंगामातील कपाशी, बाजरी, मका, सोयाबीन, उसासह इतर पिकांसाठी गरजेनुसार युरिया खत उपलब्ध व्हावे यासाठी गडाख यांनी बुधवारी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

मुळा बाजारमार्फत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना युरिया खत मिळावे यासाठी प्रत्येक शेतकऱ्यास तीन गोण्या खत आधार कार्ड लिंक करून व प्रति गोणी २६६ रूपये दराप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आले. नेवाशासह जिल्ह्यासाठी ७ हजार ५०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध होणार असल्याचेही गडाख यांनी सांगितले.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇





