टाकळीढोकेश्वर कर्जुले हर्या गावांसाठी नवीन पाणीयोजना दोन ठिकाणी फुटली - अरुण रोडे
पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरणावरून टाकळी ढोकेश्वर परिसरातील गावांसाठी मुख्य बाजारपेठ असणाऱ्या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी ३ कोटी ७५ लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्यावतीने नवीन पाईपलाईन व जलशुद्धीकरण प्रकल्प करण्यात आलेला आहे . या जलशुद्धीकरण प्रकल्पाचा व पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण करण्याची घाई टाकळी ढोकेश्वर येथील काही सदस्यांना झाल्याने त्यांनी जुन्याच पाईपलाईनला नवीन पाईपलाईन जोडून ही पाणी योजना कार्यान्वित केली . नगर - कल्याण महामार्गावर असणाऱ्या कोकाटे वस्ती व पायमोडे वस्ती या दोन ठिकाणी फुटली आहे त्यामुळे या परिसरात दोन दिवसात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे . त्यामुळे या नळ योजनेच्या निकृष्ट कामाची चौकशी करावी , अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केले आहे. तसेच संबंधित कंत्राटदार त्याच्यावर कायदेशीर कारवाई करुन कार्यालयामार्फत त्याचे नाव ब्लॅक लिस्ट मध्ये टाकावे अशी देखील मागणी अरुण रोडे यांनी केले आहे.
