माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांची गायकवाड फार्महाऊसला भेट
( विनोद गायकवाड टाकळी ढोकेश्वर ): शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यव्यापी दौऱ्यावर असलेले माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आज टाकळी ढोकेश्वर येथे श्रावण गायकवाड यांच्या गायकवाड कृषी निवास ला भेट देऊन वृक्षारोपण केले.
माजी मंत्री खोत यांनी आज राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार येथे भेट दिली त्यानंतर सभेसाठी साकुर येथे जाताना त्यांनी अचानकपणे गायकवाड फार्म हाऊसला ला भेट दिली.
यावेळी श्रावण गायकवाड आशा गायकवाड आणि विजय गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच शेतावर सुरू असलेल्या वेगवेगळ्या कृषी विषयक प्रयोगांची माहिती दिली. श्री खोत यांनी या वेळेस श्रावण गायकवाड यांच्याशी दीर्घ चर्चा करून जिरायती शेतीमध्ये मूलभूत बदल करण्याविषयी कानमंत्रही दिला. दूध घराच्या प्रश्नावरुन रयत क्रांती संघटना सध्या आक्रमक असून पत्रकार विनोद गायकवाड आणि श्रीनिवास शिंदे यांच्याशी त्यांनी दूध दराच्या विषयी सुरु असलेल्या आंदोलना बाबत माहिती दिली. तसेच राज्यातील राजकीय परिस्थितीवर ही मार्मिक भाष्य केले. यामुळे टाकळीढोकेश्वर परिसरातील प्रतिष्ठित नागरिक पारनेर खरेदी-विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष अँडवोकेट बाबासाहेब खिलारी( नाना), प्रकाश इघे सर, मोहन रोकडे, कासारे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी गायकवाड फार्म हाऊस परिसरामध्ये माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. एडवोकेट बाबासाहे खिलारी यांच्या 58 वाढदिवसानिमित्त खोत यांनी अभीष्टचिंतन केले. श्रावण गायकवाड यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त करून माजी मंत्रीमहोदयांना पुन्हा निरोप दिला. मग सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहाय्यक आदिनाथ कपाले देखील यावेळी उपस्थित होते.

