Type Here to Get Search Results !

नेवासा तालुक्यातील चांद्यामध्ये एकाचा खून दोघांविरोधात गुन्हा दाखल.| C24Taa |


नेवासा तालुक्यातील चांद्यामध्ये एकाचा खून दोघांविरोधात गुन्हा दाखल.| C24Taa |

नेवासा तालुक्यातील चांदा येथे अडीच महिन्यापूर्वी झालेल्या जुन्या वादाच्या कारणावरून एकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सोनई पोलिस ठाण्यात चांगदेव नारायण दहातोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की घोडेगाव ते कुकाणा रोडलगत चांदा नदीचे पात्राजवळ मासे विक्री होतात त्या ठिकाणी धनेश शिवाजी पुंड व त्याचे सोबतचा आणखी एक अनोळखी साथीदार यांनी त्यांचेकडील पल्सर मोटर सायकल वरून येऊन मागे आडीच महिन्यापूर्वी फिर्यादीचे चांदा गावातील हॉटेल जवळील एका जणाला यातील आरोपी धनेश शिवाजी पुंड याने मारहाण केली. 


नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG

त्यात फिर्यादीचा मुलगा बाळासाहेब दहातोंडे यास मध्यस्थी केली म्हणुन मारहाण केली त्यावरुन बाळासाहेब दहातोंडे व मयत ज्ञानदेव दहातोंडे यांनी आरोपी धनेश शिवाजी पुंड याला मारहाण केली व त्यांचेत वाद झाला होता तो वाद परस्पर आपसात मिटविण्यात आला चांदा गावात आरोपीचा अपमान झाला व गावात येण्यास नाक राहिले नाही असे आरोपी धनेश पुंड याने त्याचे आत्याचा मुलगा शिवतेज जावळे याचेजवळ बोलुन पण दाखवले होते.


व याच रोषातुन घटनेचे आरोपी धनेश शिवाजी पुंड व त्याचेसी बतचा त्याचा साथीदार अनोळखी इसम नाव पत्ता समजून आले नाही हे त्यांचेकडील पल्सर मोटर सायकल वरुन येऊन आरोपी धनेश पुंड याने त्याचे हातातील धारदार शस्त्राने ज्ञानदेव उर्फ माऊली सोपान दहातोंडे वय 40 रा चांदा ता नेवासा याचे डोक्यात वार करून त्यास जखमी करून त्यास जिवे ठार मारले आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.


ज्ञानदेव उर्फ माऊली सोपान दहातोंडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी धनेश शिवाजी पुंड व अन्य एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध सोनई पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे तपास करीत आहेत.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇