महापौर निवडीवरून नगरमध्ये शिवसेनेच्या दोन गटात राडा
अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराचा एकमेव अर्ज आल्याने आज होणार्या ऑनलाईन सभेत बिनविरोध निवडीची घोषणा होणार आहे. मात्र तत्पुर्वीच शिवसेनेच्या दोन गटांत मध्यरात्री राडा झाला.
यामध्ये निवडणुकीतून माघार घेतलेल्या उमेवाराच्या पतीला मारहाण झाल्याची तक्रार आहे. तर इतर नगरसेवक आणि पदाधिकार्यांनाही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. एवढेच नव्हे तर मुंबईहून आलेल्या पदाधिकार्यालाही मारहाण झाली आहे. हा राडा महापौर निवडीच्या आर्थिक देवाणघेवाणीवरून झाल्याचे सांगण्यात येत असून हा वाद कोतवाली पोलिस ठाण्यात पोहोचला आहे.
प्रतिनिधी : गणेश राठोड, अहमदनगर


