Type Here to Get Search Results !

नेवासा - प्रवरासंगमच्या बालचिमुकल्याचां ऑनलाईन दिंडी सोहळा...

प्रवरासंगमच्या बालचिमुकल्याचां ऑनलाईन दिंडी सोहळा...

शंकर नाबदे,नेवासा : आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम शाळेतील बालचिमुकल्यांनी वारकरीची वेशभूषा  करून तुळशीचे रोप  लावून आगळा वेगळा उपक्रम राबविला..

इयत्ता तिसरीच्या विद्यार्थी नी ऑनलाईन  उपक्रमात मोठ्या उत्साहाने  सहभागी होऊन वारकरी ,  विठ्ठल  व रुक्मिणी यांची  वेशभूषा  करून  वारकरी झेंडा  हातात घेऊन .... टाळाचा गजर करत  विठूनामाचा  जयघोष  करीत ऑनलाईन  दिंडी चा घरीच राहून आषाढी एकादशीचा मनमुराद आनंद  घेतला. 

 एक तुळस अंगणी लावू...

 तिचे पावित्र्य  ठेवू...

 शुद्ध  हवा आपण घेऊ...

 रोगाला पळवून लावू...

या उक्तीप्रमाणे आज सोमवार 19 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने  प्रत्येक विद्यार्थ्याने एक तुळशीचे  रोप  लावले...तुळस ही पवित्र स्थानी मानली जाते शिवाय ब-याच आजारावर उपाय म्हणून वापर केला जातो.  तुळस ही ऑक्सीजन जास्त प्रमाणात  देणारी  वनस्पती व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी  पडतेअसे महत्व  उपक्रमशिल वर्ग शिक्षिका  सुनिता कर्जुले मॅडम  यांनी  सांगितले.. 


नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG

या उपक्रमाला पालकांचे उत्कृष्ट  सहकार्य  मिळाले...या उपक्रमांचे  परिसरात  विशेष कौतुक  होत आहे.अशा  उपक्रमांतून विद्यार्थी चा संस्कार  , संतांची परंपरा तसेच  वैज्ञानिक दृष्टिकोन ही वाढीस लागण्यास निश्चित  मदत होणार  आहे. विठ्ठल  व रुक्मिणी च्या  वेशभूषेत  शिवतेज सुनिल शिंदे व  रूपेक्षा संदीप पांडव हे होते..या दिंडी उपक्रमात 23विद्यार्थी  सहभागी झाले होते.  या उपक्रमांचे   प्रवरासंगमच्या  सरपंच  सौ.अर्चना  ताई  सुडके  उपसरपंच  सौ.गाडेकर ताई   व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  बाबासाहेब  भालेराव यांनी  भरभरून कौतुक केले आहे.  या कामी शाळेचे मुख्याध्यापक श्री चापे सर व शिक्षकवृंद यांचे सहकार्य  लाभले..



❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇