चिमुकल्यांनी घेतला आषाढी एकादशीचा ऑनलाईन आनंद...
शंकर नाबदे,नेवासा : नेवासा शहरातील जिल्हा परिषद मुली शाळेतील चिमुकल्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी परंपरा जपत वेशभूषा करून ऑनलाइन आषाढीचा सोहळा साजरा केला.
![]() |
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇
गौरी भांड,आरोही आलवणे यांनी विठ्ठल-रुक्मिणी,संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,संत मुक्ताबाई,संत जनाबाई,संत बहिणाबाई,संत रामदास,संत एकनाथ,संत नामदेव,संत गाडगेबाबा,वारकरी वेशभूषा यांची वेशभूषा करून संप्रदायातील परंपरेचे दर्शन घडविले व ऑनलाईन आषाढी एकादशीचा आनंद लुटला.या उपक्रमाला पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कामी शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा गवळी, वर्गशिक्षिका मनीषा जवणे-लोखंडे,राजेश्री जोशी,मालनबाई कोळपकर,विजय साळुंके,वैशाली कुलट,प्रफुल्ल भागवत,ज्योती बोरूडे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे, विस्तार अधिकारी शिवाजी कराड यांनी शुभेच्छा दिल्या.




