अहमदनगर - मनपा आयुक्तांना त्रस्त झालेल्या नागरिकांकडून मैलामिश्रित पाण्याची बॉटल भेट..!
झेंडीगेट परिसरातील मैलामिश्रित व कमी दाबाने येणाऱ्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा - भा कुरेशी यांची मागणी
स्थानिक नागरिकांकडून आयुक्तांना मैलामिश्रित पाण्याची बॉटल भेट
अहमदनगर प्रतिनिधी - झेंडीगेट परिसरातील सुभेदार गल्ली, आंबेडकर चौक,बुडन फौजदारी कॉलनी येथे गेल्या दोन महिन्यापासून तीव्र स्वरूपाची पाणी टंचाई निर्माण झाली आहे याचा बरोबर मैलामिश्रित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे याभागत साथीचे आजार उदभवले आहेत अनेक नागरिकांना दुषित पिण्याच्या पाण्यामुळे पोटाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार मनपाकडे तक्रार करूनही उपाय योजना केल्या जात नाही त्यामुळे प्रभागातील जनतेच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागते आज आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन मैलामिश्रित पाण्याची बॉटल आयुक्तांना भेट दिली व पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. आयुक्त यांनी शुक्रवार पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करून स्वच्छ पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे परंतु दिलेल्या आश्वासन पूर्ण न केल्यास सोमवारी आयुक्तांच्या दालनात नागरिकांसमवेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते भा कुरेशी यांनी दिला यावेळी उपमहापौर गणेश भोसले व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
प्रतिनिधी - गणेश राठोड, C24 तास अहमदनगर
