Type Here to Get Search Results !

नेवासा - गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाश्त्रीय गीतांचे गायन करुन गुरुपौर्णिमा उत्सव साजरा.

 


कृष्णा संगीत विद्यालय येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाश्त्रीय गीतांचे गायन करुन गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

शंकर नाबदे, नेवासा : गुरुपौर्णिमा निमित्ताने कृष्णा संगीत विद्यालय येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विविध रागांचे गीत गायन करून ख्यालयज्ञ हा शाश्त्रीय गीतगायनाचा कार्यक्रम सर्व संगीत विद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा निमित्ताने साजरा केला. गुरुला गुरुपौर्णिमा निमित्ताने विविध राग गायन करुन गुरुदक्षिणा दिली. कृष्णा संगीत विद्यालय चे गुरुवर्य मा कृष्णा कुलकर्णी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले व संगीत हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे ज्याने जीवन आनंदमय होते असे सांगितले व गुरुपौर्णिमा निमित्ताने छोटासा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी साजरा केल्यामुळे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी संगीत विद्यालयातील विद्यार्थी,पालक उपस्थित होतेविद्यार्थ्यांनी पुढील राग सादर केले . 



नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG

गणेश औताडे - भुप ,साक्षी वरुडे - केदार , वरद चोरडिया - पटदिप, मोहिनी दिवाकर - देस,ओम पगारे - मालकंस,

 रुचिता आणि संस्कृती - यमन, अथर्व औटी - हमिर,

 वैष्णवी खाटीक - आसावरी,मंदार भालेराव - भिमपलास

 अपूर्वा देशमुख - शंकरा ,महेश गव्हाणे - बागेश्री,

 विद्या कोरडे - बिहाग, शुभम गोबाडे - हमिर,

वर्षा वरूडे - दरबारी कानडा ,विजय साळवे - भैरव 

छाया गुजराथी - हिंडोल,नीता शिंदे - पूरिया धनश्री ,

 तृप्ती देवचके - पूरीया ,आराध्या पेहरे -खमाज,

रुपाली विधाटे - पुरिया कल्याण ,स्वाती कदम - गौड सारंग, रुपेश शिंदे - मारू बीहाग,सुप्रिया झिंझुर्डे - देस राग सादर केला तसेच या सर्वांना तबल्यावर साथ दिली ती तबलावादक प्रतिक साळवे, सागर चव्हाण पुष्कराज घनवट,प्रसाद गायकवाड,राहुल काळे ,अक्षता शिंगारे व अर्पिता सांगळे यांनी तर हार्मोनियम वर साथ दिली विजय साळवे यांनी .या कार्यक्रमाचे छाया ताई गुजराथी यांनी सुत्रसंचलन केले.मा कोमल ताई कुलकर्णी व मा सौ कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या गायनाचे कौतुक केले.

शेवटी मा गुरुवर्य कृष्णा सरांनी भैरवी रागाचे गायन करुन सर्व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले व संगीतमय गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.




❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇