नेवासा : चांघात दोघा अवैध दारू विक्रेत्यांवर सोनई पोलिसांचे छापे ; ९९ बाटल्या जप्त
नेवासा तालुक्यातील चांदा येथील अवैध व्यवसायांवर सोनई पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा चांद्यात दोन ठिकाणी छापा टाकून बेकायदेशिर विनापरवाना दारू विक्री करणारांवर थेट कारवाई करत जवळपास साडेदहा हजार रुपये किंमतीच्या ९९ बाटल्या जप्त केल्या. अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.
येथील अमरधामसमोर चिंचेच्या झाडाखाली एका पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला विनापरवाना बेकायदेशीर दारू विक्री करताना सचिन अण्णासाहेब बाजारे (वय ३१) यास पकडले. त्यांच्याकडून प्रत्येकी ५२ रुपये किमतीच्या देशी दारू भिंगरी संत्राच्या १८० मिलीलीटरच्या ३८ बाटल्या (एकूण किंमत १९७६ रुपये) सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे व त्याच्या पथकाने जप्त केल्या.
यासंदर्भात पोलीस नाईक शिवाजी नामदेव माने यांनी सोनई पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर नंबर ०२३५/ २०२१ प्रोव्हीशन अॅक्ट ६५ (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली. पुढील तपास हवालदार डी. एम. गावडे करत आहेत.
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇
दुसऱ्या छाप्यात चांदा येथीलच आसिफ इसाक शेख (वय २५) रा. चांदा याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून ६१ बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये प्रत्येकी दीडशे रुपये किंमतीच्या इम्पेरियल ब्ल्यू कंपनीच्या १८० मिलीलिटरच्या २० बाटल्या (एकूण किंमत तीन हजार रुपये), २७०० रुपये किंमतीच्या मॅकडॉल रम २० बाटल्या प्रत्येकी किंमत १३५ रुपयेप्रमाणे, ऑफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीच्या १२ सीलबंद बाटल्या (एकूण १४४० रुपये), ११७० रुपये किमतीच्या मास्टर ब्लेंड कंपनीच्या १८० मिली च्या ९ सीलबंद बाटल्या प्रत्येकी किंमत १३० रुपये प्रमाणे असा एकूण ८३१०/ किंमतीचा माल जप्त करण्यात आला. पोलीस नाईक शिवाजी नामदेव माने यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार गुन्हा रजस्टिर नंबर २३६/२०२१ मुंबई प्रोव्हिशन अॅक्ट ६५(ई)प्रमाणे कारवाई करण्यात आली असून पुढील तपास हवालदार ए. बी. 'गायकवाड करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी सर्वपक्षीय पदाधिकारी आणि चांदा ग्रामस्थांनी अवैध धंदे आणि दहातोंडे हत्येच्या तपासासाठी गाव बंद ठेवले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चांद्यात छापासत्र सुरू करत अवैध धंदयाला लगाम लावण्यास सुरुवात केल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी, ग्रामस्थ विशेषतः महिला वर्गांने कारवाईचे स्वागत केले आहे.




