Type Here to Get Search Results !

नेवासा : डाँ. शेळके आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करा : दहातोंडे

 डाँ. शेळके आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई करा : दहातोंडे.

मराठा महासंघाचे शिष्टमंडळ गृहमंत्र्यांची भेट घेणार.. 

नेवासा : डॉ.गणेश शेळके आत्महत्या प्रकरणी दोषी अधिकऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करा,कुटुंबाला पन्नास लाखांची मदत देऊन डॉ.शेळके यांच्या पत्नीस सरकारी नोकरी द्यावी या मागण्यांसाठी राज्याचे गृहमंत्री व आरोग्यमंत्र्यांना शिष्ट मंडळासह भेट घेणार असल्याचे मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी सांगितले.

तालुक्यातील बहिरवाडी येथील मयत डॉ.शेळके यांच्या कुटुंबास शुक्रवारी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी सांत्वन भेट दिली.त्यानंतर नेवासा शहरातील पत्रकारांशी बोलतांना दहातोंडे म्हणाले की पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणाऱ्या डॉ.गणेश शेळके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून तीन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली.त्यावेळी त्यांच्या जवळ सापडलेल्या चिट्ठीत वरिष्ठांची नावे लिहिली होती. 

नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG

दरम्यान त्यावेळी उपचारासाठी तातडीने साधी रुग्णवाहिका ही त्यांना मिळाली नाही.पंचायत समिती गटविकास अधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी हे प्रकरण दडपण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला आहे.डॉ.शेळके यांच्या सुसाईड नोट मध्ये वरिष्ठांचे नावे असतांना ही पोलिसांनी स्वतःहून गुन्हा करणे गरजेचे असतांना अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.ताबडतोब दोषींवर गुन्हे दाखल करावेत यासाठी १३ जुलै रोजी राज्याचे आरोग्यमंत्री,गृहमंत्री यांची मराठा महासंघाच्या  शिष्टमंडळासह भेट घेणार असून सविस्तर चर्चा करणार असल्याचे दहातोंडे यांनी संगीतले.


या प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल न झाल्यास राज्य भर आंदोलन करण्याचा इशारा मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे,अशोक नांगरे,शामराव पवार,ज्ञानेश्वर शेलार,राजेंद्र शेटे,ज्ञानदेव कोरडे,दिलीप थोरात,रावसाहेब मरकड,ज्ञानेश्वर फसले,डॉ.महेश लगड, संतोष हंबर यांनी दिला.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇