सुगरणीचा खोपा म्हणजे निसर्गातील उत्कृष्ट कारागिरीचा नमुनाच...
सुगरण म्हणजे निस्सीम व उत्कंठा प्रेमाची कारागीरी....?
प्रतिनिधी (सुनिल पिंगळे पाबळ)
मजबूत फांदीच्या टोकाला गवताच्या काडीने खोप्याची पहिली गाठ मारताना सुगरणचे खरे टॅलेंट दिसून येते. नर काही दिवसांतच गवत व शिंदीच्या नरम बारीक काड्यांपासून सुंदर घरटे तयार करतो.
इवलीशी चोच अन् पायांची दोन बोटं. मात्र, कारागिरी एवढी की मनाला अचंबा वाटावा. होय, चिमणी एवढ्या सुगरण पक्षाच्या घरट्याची ही गोष्ट. निसर्गात आपण अनेक चमत्कार बघतो. सुगरणीचा खोपा हा निसर्गातील उत्कृष्ट कारागिरीचा नमुना आहे. तालुक्यातील अनेक शिवारात काटेरी बाभळीच्या झाडाच्या फांद्यांना टांगलेले एक नाही, तर अनेक सुगरणीचे घरटे पाहून गावकरीही थक्क झाले आहेत. सुगरणीच्या घरटे बांधणीच्या कलेला निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या तरल प्रतिभेने अतिशय यथार्थपणे काव्यबद्ध केले आहे. ( व्हिडीओ नं एक बाईट एक)
"अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला"... गळा आणि पोटावर पिवळ्या रंगाची उधळण केलेला सुगरण पक्षी नदीकाठाच्या,विहिराच्याकाठी शिवारात सरार्स पाहावयास मिळतो. नाजूक वीण असलेली मजबूत व देखणी घरटी, ही सुगरणची खरी ओळख आहे. त्याची विणकामाची कलात्मकता पाहताना मनाला भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. साधारणतः पावसाआधी जून महिन्यात नर पक्ष्यांची घरटे विणण्याची लगबग सुरू होते. जून ते ऑगस्ट हा त्यांच्या विणीचा हंगाम असतो.
मजबूत फांदीच्या टोकाला गवताच्या काडीने खोप्याची पहिली गाठ मारताना सुगरणचे खरे टॅलेंट दिसून येते. नर काही दिवसांतच गवत व शिंदीच्या नरम बारीक काड्यांपासून सुंदर घरटे तयार करतो. घरट्याचा आकार व रूप मोहक असते. घरटे पूर्ण झाल्यावर मादी सुगरण आधी घर न्याहाळते. ते पसंत आल्यास तरचं ती थांबते.अन्यथा मात्र, मादी सुगरणला काहीवेळा घरटे न आवडल्यास नर पक्षी ते मोडून टाकतो व पुन्हा नवे आकर्षक घरटे तयार करतो. तिच्यावर असलेले निस्सिम व जीवापाड असलेले प्रेमासाठी.. (बाईट नं दोन)
तर शत्रू पक्षी व सापांपासून संरक्षण व्हावे म्हणून साधारणतः काटेरी बाभळीच्या वा उंच झाडावर सुगरण घरटे तयार करते. काही लांबोळे तर काही छोटे खोपे फांदीच्या टोकास लटकलेले असतात. वाऱ्यावर झुलताना आकाशात पाळणा टांगावा, असा भास होतो. बऱ्याचदा सुगरणींच्या घरट्यांची मोठी वसाहत पाहावयास मिळते. अगदी वादळ-पावसात सुगरणीची घरटी अर्थात खोपे फांदीला घट्ट बांधले असल्याने सुरक्षित राहतात. सुगरणीची घरटे बांधण्याची कला अचंबित करते. जणू काही सुगरण म्हणजे पक्षी जगतातील अभियंताच होय! कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची निरीक्षणशक्ती व सूक्ष्मदृष्टी अचाट होती. निसर्गाच्या प्रकोपात मजबूत इमारती व पुल पत्त्यासारख्या कोसळताना पाहताना बहिणाबाईंच्या सुगरण कवितेतील ओळी सहज ओठावर येतात. "उलूशीच चोच तेच दात तेच ओठ तुला देले रे देवाने दोन हात, दहा बोटं" चिमुकल्या सुगरण पक्षाचे वर्णन करताना बहिणाबाईंनी माणसाच्या क्रियाशील शक्तीकडे बोट दाखविले आहे. सुगरणीचा हा संदेश माणूस कधी अंगीकार करेल का, हा एक प्रश्नच आहे. पण शेतकऱ्यांना सुगरण पक्षी वरदानचं आहे त्यांच्या चिमुकल्या जीवांना खाद्य हे शेतीमधुन उपलब्ध होतं आणि ती एक किटकनाशक म्हणून शेतात काम करत असते म्हणून कवी बहिणाबाई इवल्याशा च्या जीवाची बरोबर माणसासोबत करतात याठिकाणी नर पक्षीची सुगरण पक्षाच्या वरील प्रेम व्यक्त होतं आहे माणासाप्रमाणे हे ही पक्षीही एकमेकांना वर जीवापाड प्रेम करतात अगदी शेवटापर्यंत....

