Type Here to Get Search Results !

पाबळमधील धोकादायक प्रकार श्रध्दा की अंधश्रद्धा..?

 पाबळमधील धोकादायक प्रकार श्रध्दा की अंधश्रद्धा..?

               


पाबळ प्रतिनिधी (सुनिल पिंगळे)  आज 21 व्या शतकातही अनेक लोक अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून आहेत. आज आपल्या देशातील लोक विशेष करून ग्रामीण भागातील स्त्रिया अंधश्रध्देच्या शिकार होत आहे 

       नुकतीच शिरूर तालुक्यातील पाबळ मधील स्मशानभूमीत  धोकादायक प्रकार  समोर आला असुन यामध्ये एका काळ्या कपड्यामध्ये बारा लिंबू व हळदकुंकू व कोहळ्याचा भोपळामध्ये एका 18 ते 20 वय गटातील तरुणीचा फोटो दाभण नावाच्या खिळ्यासारख्या तीक्ष्ण खिळ्याच्या साहय्याने फोटोमध्ये टोचून कोहळ्यात लावला होता तर त्यावर टाचणीही गोलाकार पध्दतीने लावलेल्या होत्या हा धोकादायक प्रकार आज एका दशक्रिया विधीच्या निमित्ताने समोर आला यावरून या अघोर प्रकराला श्रध्दा की अंधश्रद्धा म्हणावा लागले असा प्रश्न निर्माण होतो आहे .तर प्रामुख्याने ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात लोक अंधविश्वास मानतात. नकली बाबा यांच्यावर विचार न करता विश्वास ठेवुन हे पाखंडी बाबा लोक त्यांच्या मनात काहीतरी भय निर्माण करून त्या समस्येचे निराकरण म्हणून काहीतरी साधना आणि जादूटोणा करायला भाग पडतात.त्यापैकी पाबळ मधील हा एक प्रकार असावा. तर अशा भोंदू  बाबांचे दावे असतात की ते तंत्र शक्तीने प्रेम विवाह, जमीन संबंधी समस्या, संतान  वशीकरण सुख इत्यादी समस्यांपासून लोकांना मुक्ती देऊ शकतात. पण हा दावा साफ  खोटा ठरत असुन या अंधश्रद्धामुळे शिक्षित-अशिक्षित दोन्ही वर्गातील लोक अंधश्रद्धेचे शिकार होतात.  पाखंडी तांत्रिक लोक जादूटोणा करण्यासाठी लोकांकडून हजारो व लाखो रुपये मागुन लुट करत असतात याशिवाय बऱ्याचदा प्राणी तसेच लहान मुलांची बळी देखील मागितली जातात तर आपल्या तंत्राच्या नावावर काही तांत्रिक स्त्रियांचा छळ करतात त्यामुळे अशा गैरकृत्य करणाऱ्याला वेळाचं आळा घालणे महत्त्वाचं आहे.

           पाबळ ता.शिरूर येथील हा प्रकार मानवातील हानी पोहचवणारा असुन त्यावर लावलेले फोटो हा अघोरा प्रकार संबंधित मुलाची मानसिकता बिघडवणारा आहे पाबळच्या स्मशानभूमीच्या दहनस्थाना असलेले हा अघोरा प्रकार उघडकीस आल्याने पाबळमध्ये खळबळ उडाली आहे  अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शासनाने अनेक कायदे बनवले असुन फसवणूक करणे कायद्याने गुन्हा आहे. तर आजूबाजूला कोणी तंत्र मंत्र साधना करीत असेल तर त्याची माहिती पोलिस स्टेशन द्यावी अशी विंनती सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम सांळुके यांनी केली आहे तर फक्त परमेश्वरावर श्रद्धा ठेवायला हवे. श्रध्देला अंधश्रध्देच्या रूप देता कामा नये ही आता  हि काळाची गरज आहे तेव्हा श्रद्धा जरुर असु द्यावी पण त्याची अंधश्रद्धा मध्ये वर्गीकरण करुन नये असे  मत  प्रसिद्ध किर्तनकार सोपान महाराज गाडगे  यांनी सांगितले आहे तर महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारिणी सदस्या नंदिनी जाधव यांनी याप्रकराबाबत नाराजी व्यक्त करत अशा अघोर कृत्य करणाऱ्याला कठोर शासन करण्याची सुचना संबंधित पोलीस प्रशासनाला दिल्या आहे