सोनई येथे बकरीईद सणानिमित्त आयोजित शांतता कमेटी बैठकीत मार्गदर्शन करताना सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे.यावेळी विनायक दरंदले उपस्थित होते.
नेवासा - कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेवून सोनई पोलिस ठाण्याच्या वतीने बकरीईद सण साध्या पध्दतीने साजरा करावा याकरीता शांतता कमेटीची बैठक घेवून उपस्थितांना आवश्यक सुचना देण्यात आल्या.
![]() |
छत्रपती शिवाजी चौकात असलेल्या प्रार्थना स्थळी घेण्यात आलेल्या बैठकीत सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पत्रकार विनायक दरंदले,हाफीज जाफर,इसाक शेख,नजीर शेख,महंमद सय्यद, फिरोज पठाण,रफीक सय्यद, कासम शेख, अकील पिंजारी,पोलिस कर्मचारी बाबा वाघमोडे,अव्हाड व दहीफळे उपस्थित होते.
सर्व मुस्लिम बांधवांनी बकरीईदची प्रार्थना आपल्या घरीच करावी.कुर्बानी कार्यक्रम कुटुंबातच साजरा करुन गर्दी जमा करु नये.कोरोना संसर्गाची तिसरी लाट लक्षात घेवून काळजी घ्यावी.असे सहायक पोलिस निरीक्षक कर्पे यांनी सांगितले.२१ जुलै रोजी सर्व शासन नियमांचे पालन करण्यात येईल असे नजीर सय्यद यांनी सांगितले.इसाक शेख यांनी आभार मानले.
नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇




