Type Here to Get Search Results !

नेवासा - बी.एस्सी.अॅग्रीला प्रवेश नाकारल्यामुळे उपोषणाचा इशारा. | C24TAAS |

बी.एस्सी.अॅग्रीला प्रवेश नाकारल्यामुळे उपोषणाचा इशारासह मरण्यास निवेदनाद्वारे परवानगी ची मागणी.
नेवासा - बी.एस्सी अॅग्री शिक्षणास थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश नाकारल्यामुळे यज्ञेश संजय नागोडे या विद्यार्थ्याने सरकारच्या कृषी विभागाच्या चुकीच्या धोरणाचा निषेध करून नेवासा तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देऊन मरणास परवानगी मिळण्याची मागणी निवेदनात केली आहे.

यज्ञेश नागोडे यांनी नेवाशाच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी तीन वर्षांचा कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला असून, यापूर्वी पदविका विद्यार्थ्यांना बी.एस्सी अँग्रीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश दिला जात होता. परंतू आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ व सरकारने प्रवेश नाकारल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.


नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी C24 तास WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/I36ibzSWvTDCnuzDjaFcGr
______________________________

Telegram वर ग्रुप जॉईन करा...👇

https://t.me/joinchat/S3zVPTU7uWIqFhgG


राज्य सरकारच्या कृषी विभाग व महात्मा फुले विद्यापीठाच्या चुकीच्या धोरणाविरोधात राज्याचे कृषिमंत्री व मंत्रालयात सरकारच्या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठविला. मात्र, सरकारने विद्यार्थ्यांचे हित जोपासले नाही. त्यामुळे कृषीच्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा,

अन्यथा मी आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे. मला ईच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणीही यज्ञेश नागोडे यांनी नेवासा तहसीलदारांना निवेदनात केली आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री, जलसंधारण मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पाठविण्यात आल्या आहेत.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇